समता ग्रंथालयाची सुरुवात झाल्यापासून म्हणजे १ जानेवारी २०१४ पासून प्रत्येकवर्षी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रंथालयाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. या वर्धापन दिनाचे स्वरूप हे साधारणतः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व डॉ.अण्णासाहेब शिंदे विद्यालय देवगाव यांचे विद्यार्थी व देवगाव ग्रामस्थ यांच्यासाठी ग्रंथालयातील पुस्तक प्रदर्शन व जाहीर व्याख्यान या स्वरूपात असते. परंतु यावर्षी वर्धापन दिनाच्या दिवशी नवीन काय उपक्रम घ्यावा असे कल्याण टांकसाळे (IIT Engineer व मागील वर्षीच्या वर्धापन दिनाचे प्रमुख वक्ते) यांना विचारले असता त्यांनी कादंबरीचे सामूहिक प्रकट वाचन करण्यास सुचवले. कादंबरी म्हणून प्रकाश नारायण पंत यांच्या चकवा, वणवा या सोप्या भाषेतील कादंबरीची निवड कार्यास सांगिलते पण संगमनेरच्या पुस्तक दुकानांमध्ये त्या कादंबरी भेटल्या नाही. म्हणून मग समता ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या साने गुरुजी लिखित व अनुवादित काही कादंबरी निवडल्या. वाचनासाठी टॉल्स्टॉय यांच्या "रिसरेक्शन" या कादंबरीची साने गुरुजींनी अनुवादित केलेली मराठी कादंबरी "नवजीवन व दुर्दैव" निवडली. त्या कादंबरीचे काही पाने वाचली परंतु ती कादंबरी अनेक धाडसी वास्तवतेला भिडणारी परंतु प्राथमिक स्तरातील श्रोत्यांना गोंधळात टाकणारी असल्याने तिचे वाचन मध्येच थांबले. त्यानंतर वाचनासाठी सोप्या भाषेतील "साने गुरुजी : जीवनविकास" हे पुस्तक निवडले .
Wednesday, January 25, 2017
समता ग्रंथालयाचा तिसरा वर्धापन दिन : सामूहिक प्रकट वाचन

Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment