![]() |
समता ग्रंथालय |
एवढ्यातच आपल्या देवगावचा एक सहकारी जो आर्मीमध्ये सेवेत आहे तो सुट्टीवर आला होता आणि सामाजिक कामातील त्यांची आवड खुपच चांगली आहे . म्हणून मी त्यांना सुट्टीत वाचनालय , व्यायामशाळेला भेट देऊन तेथील युवकांशी हितगुज करण्याची विनंती केली . ते जेव्हा तेथे गेले तेव्हा तेथे वाचनालय व व्यायामशाळा बंद दिसली व त्यांनी याविषयीची त्यांची प्रतिक्रिया (वाचनालय , व्यायामशाळा बंद असल्याबाबतची काहीशी नाराजी) "सामाजिक प्रश्नोत्तरे" या आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये टाकली व या उपक्रमांत सहभागाची ईच्छा व्यक्त केली . त्यामुळे गावातील सर्व तरूण साथींना वाचनालय , व्यायामशाळेची सुरूवातीपासुन आत्तापर्यंतची वाटचाल माहिती व्हावी यासाठी लिहिण्याचे ठरवुन खालील तपशील आपणास माहिती म्हणून देत आहे .
वाचनालयात गर्दी होण्याचा प्रमुख काळ हा परिक्षेचाच असतो कारण त्याव्यतिरीक्त देखील अवांतर वाचन व अभ्यास करण्याची सवय व हिवाळ्या व्यतिरिक्त व्यायामात ठेवावे लागणारे सातत्य , त्यासाठी साहित्य उभारणीचे कठीण कामातील चिकाटीची सवय येणाऱ्या पिढीला लावणे सर्वात मोठे आव्हान असुन यासाठी गावातील आपले तरूण साथी प्रयत्न करत आहेत . परंतु त्याला अजुन म्हणावे असे यश आलेले नाही आणि ते एवढ्या लवकर येणे देखील अपेक्षित नाही . कारण वाचनाचे , अभ्यासाचे , व्यायामाचे मुल्य रूजवुन एक उत्साहाचे वातावरण तयार करणे गरजेचे आहे . त्यासाठी खुप मोठा कालावधी सातत्याने काम करणे व सर्वांचा त्यात सहभाग घेणे देखील तेवढेच आवश्यक असुन हे फक्त निवडक तरूणांचे काम नसुन त्यासाठी गाव म्हणून एक सामुहिक जबाबदारीची गरज आहे. ती जबाबदारी आपण भविष्यात नक्कीच पूर्ण करू .
ही जबाबदारी घेणे म्हणजे नेमके काय करायचे हे समजून घेण्यासाठी काही पर्याय सुचवतो आहे ते खालील प्रमाणे ,
❇ आपण शक्य असल्यास दररोज अथवा जेव्हा गावात येईल तेव्हा किमान 15 मिनीटे पेपर वाचण्यासाठी "वाचनालयात" जाईल व व्यायामासाठी , तरूण सहकारी मित्रांशी हितगुज करण्यासाठी किमान 45 मिनीटे व्यायामशाळेसाठी देईल ईतर सहकार्यांना देखील यासाठी प्रोत्साहित करेल .
❇ अभ्यासिकेत दर गुरूवारी सुरू असणार्या साप्ताहिक अभ्यास मंडळात आपण प्रत्येकाने सहभागी होऊन वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चर्चा करत विचारांची प्रगल्भता करणे .
📚वाचनालयाची सद्ध्याचा लेखाजोखा व आर्थिक
💶
💰 स्थिती -
आपल्या ग्रंथालयास मिळालेली विविध स्वरूपातील मदत -
❇ संजय देशमुख , माधव लामखडे -
गाव तलावातील पोयटा विक्रीतील सार्वजनिक रकमेतील 5,000 रूपये वाचनालयास खुर्ची खरेदीसाठी देण्यात महत्त्वाची भुमिका (खुर्ची खरेदी एकुण - 9,500 रूपये) तसेच व्यक्तिगत प्रत्येकी रुपये 500 देणगी .
गाव तलावातील पोयटा विक्रीतील सार्वजनिक रकमेतील 5,000 रूपये वाचनालयास खुर्ची खरेदीसाठी देण्यात महत्त्वाची भुमिका (खुर्ची खरेदी एकुण - 9,500 रूपये) तसेच व्यक्तिगत प्रत्येकी रुपये 500 देणगी .
❇ डॉ. संदीप अरगडे सर - रूपये 1,000 ची 20 अत्यंत वाचनीय पुस्तके व वाचनालय कपाट लाॅक दुरूस्ती 300 रूपये मदत .
विनामूल्य व्याख्यान व 50 वेगवेगळी पुस्तके भेट स्वरूपी व एका महत्वाच्या "सत्यशोधक" मासिकाची वार्षिक फी भरून ग्रंथालयास मासिक सुरू केले .
1 वर्ष "दै. लोकसत्ता" वर्तमान पत्र वाचनालयास देणगी स्वरूपात (अंदाजे खर्च: रूपये 1,000) .
❇ 500 रुपये देणगीदार -
भास्कर बांगर , सोमनाथ श्रीरंग पावसे , अशोक पावसे (आबा) , भानुदास लामखडे , लहानभाऊ कोटकर , मंदाताई करंजेकर , अनंत चत्तर , डी. आर . कोटकर
भास्कर बांगर , सोमनाथ श्रीरंग पावसे , अशोक पावसे (आबा) , भानुदास लामखडे , लहानभाऊ कोटकर , मंदाताई करंजेकर , अनंत चत्तर , डी. आर . कोटकर
आपण लोकवर्गणीतुन खुर्ची , टेबल , पुस्तके जमवली आहे परंतु लोकवर्गणीच्या अल्प प्रतिसादामुळे श्री. गोरख पानसरे (संगमनेर खुर्द) यांचे खुर्ची खरेदीचे 3,500 रूपये एक वर्षापेक्षा जास्त काळापासून देणे बाकी आहे . तरीही यातुन मार्ग काढत आपले युवा साथी त्यावर उपाययोजना करत आहेत .
(त्यात पुश अप बार , वेट थालीज , डंबेल सेट , सिंगल बार , डबल बार या साहित्याचा सहभाग आहे .)
इतर साहित्य उपलब्ध करण्यासाठी आणखी जास्त प्रयत्नांची व सक्रिय सहभाग व आर्थिक मदतयुक्त सहभागाची गरज आहे तो सहभाग आपण यापुढे देऊयात .
व्यायामशाळेत पहाटे व रात्री देखील व्यायाम करता यावा यासाठी "प्रविण जाधव" व इतर सहकारी मित्रांनी विनामूल्य लाईट कनेक्शन व पट्टी फिटींग करून दिली . यात ईलेक्ट्रीक फिटींग साहित्य (2,500) देखील "प्रविण जाधव" यांनी स्वतःच्या क्रेडिटवर आणले परंतु पुन्हा लोकवर्गणी व युवा साथींच्या अल्पप्रतिसादामुळे त्या रकमेतील रूपये 1200 एवढी देणे बाकी आहे .
या सर्व गोष्टींवर काम करत कामाचा व्याप आपण पुढे देखील वाढवत राहण्याचा निश्चय करूयात .
✒
📋

No comments:
Post a Comment